श्रीगणेश आरती – Marathi

SHREE GANESHJI AARTI

श्रीगणेशजी की आरती

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।।
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती
दर्शनमात्रे मन:कामना पुरती ।। ।।

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरेजडीत मुगुट शोभतो बरा
रुणझुणती नूपूरे चरणी घागरिया ।। २ ।।

जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती
दर्शनमात्रे मन:कामना पुरती ।। ।।

 लंबोदर पीतांबर फणिवरबंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। ३ ।।

जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती
दर्शनमात्रे मन:कामना पुरती ।। ।।